थोडी गंमत

सहा टनी मामा नीट हास (काका, दादा, बाबा सगळे असेच वजनदार!)
ती होडी जाडी होती. (स़डसडीत असती तर चांगली दिसली असती?)
तो कवि डालडा विकतो (मलम, सामोसा, सरस ...काय वेळ आली ही कवीवर....)
भाउ तळ्यात उभा. (उभा का बस की रे भाऊ)
तरस करी कसरत. (जरा कौतुक करा की तरसाचे..)
रामाला भाला मारा. (रावण म्हणाला असेल.)
मीठ दे ठमी . (नाही तर ठमी साखर द्यायची !)
वाह हाच चहा हवा . (आधी झुल्पे उडवून मग म्हणण्याचे वाक्य.)
चार चाकाच्या काचा रचा. (पटकन म्हणून दाखवा बरं !)
बारा टनी बाबा नीट राबा . ( नाही तर आमचे ही वाजतील ना बारा)
चीमा काय कामाची. (चिमण्या सापडतात तरी कुठे हल्ली)