कडक कायद्याबद्दल , संप वगैरे , सुट्या

खरे तर सध्या बलात्काराच्या बातम्या मुळे सारखे कायदा कडक करावा अशी मागणी मूळ धरू लागली आहे. पण खरेतर कायदा हा सुलभ हवा व सर्वांना सारखाच हवा त्यात कोणालाही सूट मिळू नये तसेच सोपा एवढ्याच साठी की कायदा पाळावा व त्याप्रमाणे जगावे असे सामान्य माणसाला वाटावे.  सर्वांना समान असला की कोणीही कायद्याला वेठीस धरून  दुसऱ्यावर अन्याय करू नये.
आज कामगार नेते सारखे संप करून मागण्या मान्य करून घेतात त्यावर माध्यमे कामगाराची मागणी रेटून धरत होती त्यामुळे अद्याप फारसे संपात नसलेले प्राध्यापक, व्यापारी, व डॉक्टर   यांनी संप केला  त्यावर मात्र त्याच्या मागण्या अशा का झाल्या  व ते लेखी आश्वासन मिळाल्या शिवाय संप मागे घ्यायला का तयार नाहीत. ही सरकारी बाजूच रेटत आहेत
आज असलेले आरक्षण, व्हीआयपी सुरक्षा व्यवस्था,सुट्याची (सरकारी) फक्त सरकारी नोकरांना मिळतात. त्याची संख्या पाहिली तर वर्षातील किती दिवस आपल्याकडे काम बंद असते असे असले तरी सुट्या ज्या नावाने देतात त्यातील किती लोकांना त्यासाठी सुटीची गरज असते व जेव्हा सुटी असते तेव्हा ती येते का बऱ्याच दा मुस्लिमाचे सण हे आयत्यावेळी बदलतात. या वर्षी अशी महावीर जयंतीची सुटी पण दुसऱ्यादिवशी होती तेव्हा सुट्या न देता त्यांना पगारी रजा वाढवून द्याव्यात व एकदम बोजा पडू नये म्हणून यामहीन्यात इतक्या या सुट्याची संख्या अशी सांगावी.