टायमाची वेल

भाषा : आग्री , मराठी

ती वेल गेली 
आन घऱ्यालाचा तासकाटाच
जनू हरवून बसला
मोठा काटा मिनिटे मोजू लगला
पन किती आन का भिंगायचे
कईच कलेना त्याला
अली, आली, बोलतानाच
ती वेल निघुनशा गेली
मस्तींन भिंगनारा तो पातल काटा
कललेच नाई बिचाऱ्याला
आता आपला कोनीच नाई ते
जिंदगानीचे  घऱ्याल
सतत फिरनारे
कधी ताकद खपल्याने, कंदी खेल खपल्याने
कवा पान्यान बुरल्याने
कधी क, तर कंदी आनिक काइ
आजारी
पन तरीबी चरफर
कधी वेगान
कधी माग परनारे
पन कोनचाबी रस्ता ना बघनारे
नवे काटे, नवेच शेवटाला
काम करतील बी टायमाला
घऱ्यालबी नवा झेता येईल
पन वेल मातर...
पन वेल मातर हातानशा निगून गेलेली आसल.
अनिल रत्नाकर