कोनी कोनाचा नाही

माझी माणसे, माझी जात

दिरक्या दावरल्या का मंग
कुठेपन ईचाकतो दात
माझ्याच जनावरांच्या दावनी
माझ्याच मालकीचे लगाम
मीनीच बांधलेली वेसण 
माझ्या साऱ्या कुटुंबाला
रासच गुतले सारे
अवरा का जीभ बाहेर आली 
अन तीला बघायला डोले पन 
मानाचे चिकने चिकने रथ
अहंकाराची सिंहासने
प परला का ऊठलाच धुरला 
मानुसकीचा काला रगत
जिंकून हारलेले
जमिनीवर लोलताना
इज्जतीची माती खाताना
ओलख ईसरलेली
कपालावर बेईमानीच्या आठ्या
जिंकले खरे पन खोटा वागून
भेसूर शांतता
भावकीचा नाश
हतबल रथचक्रे
जंगलेल्या तलवारी
शब्दांचे थारोले
घोऱ्याची काकुलती
लगाम तुटलेले
खोगीर लटकल्याले
चिलखताच्या मागे
निखाल रक्तबंबाल 
आपलीच मानसे, आपलीच जात
मागचा सगला, ईसरली क्षणार्धात