आठवनी

पान्यानं माती चिंब ओली होली

सुरयाला फसवून मस्त न्हाली
मातीच्या सुगंधाने
फुला पानाला झिंग आली
आनी तवा
मना डोल्यसमोर जुना घर दिसला
कौलारु, आठवनींनी भिजलेला
सम्दीकरे खेकऱ्यांची बिले
मधीच एकादा चीरा वलवले
अंगनान रास फिरती गांडुले
कौलानशा कवकवा 
सुरवंट लोंबकाललेले
पानवेलीखाली जंगलेली
फुटकी बालदी
साबन कवा तरी दिवालीला
मंग कोरा काला च्या
मोरक्या कानाच्या कपानशा
जमीनीला वोल अलेली
बोटांना कुया होलेली
समद्या शरीरान मुंगल्यानी
शर्यत चालवलेली
आन जर भेटलीच तर 
शिली भाकर पान्यान बुरवलेली
पन पावन्याला 'या जेवायला'
आसा आग्रीव करन्यास 
जीभ कवाच ना चुकल्याली
पागोल्या, पानवेली गलतान
तवा आठवनी मनान दाटतान
अंग़नातल्या रांगोल्या 
अता गॅलरीन सजतान
आठवनींच्या कागदी होऱ्या 
हॉलमंदीच नांगरतात
मना कलतो 
पानवेलीची गरज अता खपली
आठवनीं मातर 
थेंब थ्यांब गलतात
काही आग्री शब्दांचे अर्थ:
पानवेलः पागोळ्या, कुयाः चिखल्या
चीराः साप, सरपटणारा प्राणी