धाची नोट

भाषा :आग्री, मराठी

नाकट्या ओंजलीन गोंडस तानुले
झोपरीन कुराच्या किसनाची पावले
बाला, लरू नको, झे बरा ही दिरकी
गोर हसे तो अन ती श्रीमंत होली
एक दिसाची मजुरी तिला भेटली
चुरगाललेली धाची एक नोट
भोग माझे नको देऊ नसिबाला
बाय सटवाई, यश देस बालाला
गालावर उमटते पोटानची खली
कपाली बिलगली भुकेची सावली
खोल खानीन कामाला ती गेली
ब, ब, ब ओरडत तो साद आर्त घाली
शिकुनशा तो मोठा सायेब होला
नोट धाची दिली बला खर्चायला