भाजी करण्याच्या आधी थोडावेळ मुगाची डाळ पाण्यात भिजत घाला. दुधी भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. मध्यम आचेवर पातेले तापत ठेवा. ते पुरेसे तापले की त्यात फोडणीसाठी तेल घाला. ते तापले की त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा व लगेचच त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या व मुगाची डाळ घालून थोडे परतून घ्या. आता दुधीभोपळ्याच्या फोडी घालून ढवळा. त्यावर झाकण ठेवा. काही सेकंदाने झाकण काढा व त्यात अगदी थोडे पाणी घाला. असे अगदी थोडे थोडे पाणी घालून भाजी शिजवून घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड, मीठ व साखर घाला. भाजी ढवळून घ्या. नंतर त्यात दाण्याचे कूट व नारळाचा खव घाला व गार दूध घाला. दूध तापवून मग ते गार झाल्यावर घाला. आता परत झाकण ठेवा व थोड्यावेळ भाजी शिजू दे. थोड्यावेळाने झाकण काढा. आता ही भाजी चांगली मिळून मिसळून आलेली असेल. दाटपणाही आला असेल. दूध घातल्याने एक वेगळी चव येते. ही भाजी पोळीपेक्षाही गरम भाताबरोबर जास्त चांगली लागते.
टीपा नाहीत.
सौ आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.