नक्राश्रु

ऐन उमेदीन तीच्या

सपनांना लागली ठीगले
कुटुंब, नातेवाईक फिसकारलेले
माहेरचे रस्ते बंद झालेले
सासरबी पार कोलमडलेले
सम्देच दोर तुटलेले
नवऱ्याला चमचाभर कमाई
आन खायाला कढाईभर लेंढार
पीठा कन्यांची पक्वान्न
काम कवरीचा नाई 
आन सदा भुकेली जत्रा
सासरचा अधिकार म्हनून वर
सारखे टोचून बोलनार
तीला छलनारा ह्यो तबेला
नकलत, हलू हलू मोठा होला
ती गेली
ती गेली तवा तीला चोर बोलनारा
तीची इज्जत उघऱ्यावर मांडनारा
पालवी तीची तोरून टाकनारा
हा स्वार्थी , मतलबी कबिला
डोल्यानशा खोटा पानी कारनारा
म्हंजीच नक्राश्रू ढालनारा
तीच्या फोटोसमोर पालथा परलेला
जीतेपनी नरक आनला नशिबान 
आन आता तीचे गुनगान गानारा