स्त्री जलम ..एक गुन्हा?

माझा काम मीनी कवाच कुनाला ना सांगितला

अता मातर मना, चार खांद्यांनी आधार दिला
स्त्रीधनच अले कामाला, समद्यांच्या शिक्शनाला
अता, दागिने ओरबारले, आन मोती जिभेवर ठेवला
तोंडानशा घास ज्यांनी ओरून झेतला
अता, अंगावर भाताचा, कणकीचा लारू ठेवला
ईमानदार चपलेपरमाने झिजविले जिंदगीला
अता, एक स्त्री म्हनुनशा अग्नी पायाकरून दिला
नाही घरान झेतले कधीच कोनी तुलसीला,
मला आन माझ्या अस्थीला
दिवा मातर अखेरचा घरान लवला
पन कोपऱ्यानच ठेवला