मयत प्रामानिकपनाचे

क बोलतो, आज प्रामानिकपना मेला

रास गुर्दी होती बाला मयताला
पन दुख न्हव्हता कुनाला होला
सम्द्यानी येकमेकाला गुलालाने माखवला
कारन अता रान मोकले चोरधंद्याला
प्रामानिकपनाचा पोस्टमार्टम केला
त दिरकी नाय घावली कोनाला
सत्य, आन ईमानदारीचा वास रक्ताला
पन सत्याची कुबरी फॅक्चर होली
ईमानदारीला, लबारी मैतरीन भेटली
आन मंग आबरू नाकटी नाचली
एक साल व्हईल ह्या घटनेला
आज पुन्यतीथी प्रामानिकपनाची
त्यानिमितान तरी आठवन खऱ्याची
सत्याच्या ऊलुशा डबक्यान
आता गोंगाट फक्त बेईमान बेरकांचा