ईस्कटलेली सप्नकारंजी

शुभ मुहुरत व्हता तो, पंचांग बोलतो 

मुहुरतावर बेंड वाजला, 
आन नव्या दारान पाऊल परला
सपनानचा महाल सामने दिसला
कई दिसानच कलला
नवऱ्याला बीमारी ह 
पन ऊशीर होला 
सपनांना तरा गेला
लगीन त मुहुरतावर लागलेला 
एका वर्षानच नवरा मेला
पोरीचा सत्यानास केला
जर सम्दा घरच्यांना म्हाईत व्हता
त मंग लगीन कला केला?
एका देखन्या पोरीचा वाटोला केला
लगीन त मुहुरतावर लागलेला
सुन्न, भण्ण, भेजाच्या चिंध्या होल्या 
संस्काराची सालपटे निंगली
आयूष्याची पारंबी लटपटली
हिरव्या पानांनाच आज जाली परली
लगीनपत्रिका त देवांचे आशीर्वाद झेवून छापलेली
मालकाची बिमारी घेवून ती कशी जगेल?
पंचांगान बहुतेक कई लिवल्याला असेल?
लासलेल्या शब्दांची अता झोंबी
देव जर कुठं आसल 
तर त्याला का ऐकू येत नाही 
ही तुटलेल्या फांदीची किंचाली 
कारन गावाच्या आशीर्वादान सोयरिक जुलवलेली