कचरापेटी

"अरे समजतात काय हे लोकं मला"

"काय रे काय झालं"

"अरे, जो येतो तो त्याचं रडगाणं गातो. "

"हं, घे चहा घे"

"थँक्स, तो सावंत, बायको पिडते म्हणून रडत होता... तर ती शहाणे... "

"कोण शहाणी"

"शहाणी नाही गं, शहाणे, ती बाई.... "

"ई.... बाई काय म्हणतोस"

"मग काय म्हणू? "

"अरे पंचविशीची मुलगी ती.... पण तिचं काय? "

"तिला अद्याप लग्न करायचं नाही पण घरचे मागे लागलेय".

"हं"

"मला कधी कधी वाटते की मी एक कचरापेटी झालोय की काय, कोणालाही काहीही खुपलं की आला माझ्याकडे"

"मग तू काय करतोस? "

"काय करणार? माझ्यापरीने मी कधी समजावतो, कधी नुसतंच ऐकतो, तर कधी फुकटचा सल्ला देतो. "

"आणी"

"आणी काय? "

"मग पुढे काय? त्या लोकांना त्याचा काही फायदा? "

"हो... सगळे नेहमी म्हणतात की मी त्यांना खूप जवळचा वाटतो. अगदी कोणतंही सीक्रेट सांगता येईल असा आणी २-३ तर अगदी भक्तच झालेत"

"भक्त? "

"हा म्हणजे फॅन. २-४ सल्ले खूप उपयोगी पडलेत ना.... "

"अरे मग कंटाळा कशाचा? "

"हो पण इतकं सगळं ऐकल्यावर आजकाल वाटत की काय उपयोग या सगळ्याचा. मी एक कचरापेटी आहे की वाटते, कोणीही यावं अन दु:ख टाकून जावं. "

"हो पण सोबत तू त्यांना हवं असलेलं सुखही देतोस की"

"........ "

"आणी एक सांग, हे तुझं रडगाणं आहे अन मी कचरापेटी असं म्हटल्यावर तुला काय वाटेल? "

"नाही यार... तू तर माझी जवळची मैत्रीण आहेस... "

"तसंच तू त्यांचा जवळचा मित्र आहेस, अगदी कचरापेटीसारखा दिसत असला तरी... कळलं"

" हा हा हा... कळलं... थँक्स वन्स अगेन"