गव्हाचे पीठ अर्धी वाटी, मैदा व हरबरा डाळीचे पीठ मिळून अर्धी वाटी
लोणी पाऊण वाटी, ग्रॅन्युलेटेड शुगर आणि ब्राऊन शुगर मिळून अर्धी वाटी
२ चिमूट बेकींग सोडा
साजूक तूप बेकिंग ट्रेला लावण्यापुरते
१ तास
२ जण
वरील सर्व मिश्रण एका वाडग्यात एकत्र करा व हाताने मळून घ्या. पिठाच्या गुठळ्या रहायला नकोत. नंतर हे मिश्रण झाकून ठेवा. २० मिनिटे हे मिश्रण झाकले गेले पाहिजे. नंतर बेकींग ट्रे ला तूपाचा हात लावून घ्या. मुरवलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करा व त्यावर काट्या चमच्यामधल्या काट्याने अलगद हाताने चेपा. ट्रे मध्ये हे सर्व गोळे काही अंतर राखून ठेवा. ओव्हन २५० डिग्री फॅरनहाईट वर ठेवून ट्रे त्यात ठेवा. ३० ते ३५ मिनिटे भाजून घ्या. बिस्कीटे तयार होतील. ओव्हन बंद करा. काही वेळाने ट्रे बाहेर काढून सर्व बिस्कीटे एका ताटात गार करायला ठेवा. पूर्ण गार झाली की डब्यात भरून ठेवा.
वरील मिश्रणात ३५ बिस्कीटे होतात. वर जे मिश्रण दिले आहे त्यामध्ये ग्रॅन्युलेटेड शुगर जास्त व बाकीची ब्राऊन शुगर थोडी घालावी. शिवाय मैदा जास्त व बाकीचे डाळीचे पीठ कमी घ्या. वरील सर्व मिश्रणाचा एकत्रित मळून जो गोळा तयार होतो तो सैलसर कणकेसारखा झाला पाहिजे. लोण्याचे प्रमाण दिले आहे तर ते थोडे कमी जास्त घालावे म्हणजे गोळा सैलसर होण्याइतपत घालावे.
ही बिस्कीटे चवीला गुड - डे बिस्किटासारखी लागली.
मीच
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.