पहिला पाऊस

आठवतोय, पहिला पाऊस तुझ्यासोबत अनुभवलेला,

आपल्या प्रेमाच्या आणभाकेची, जणू साक्ष घ्यायला आलेला,

चिंब भिजलेली मी, चिंब भिजलेला तू आणि चिंब सारा आसमंत,

भर आषाढात फूललेला, जणू प्रेमाचा वसंत

अजूनही संदिग्ध आहे, मात्र भिजलो होतो कशाने?

कोसळणाऱ्या मेघानी, की बरसणाऱ्या पावसाने?

आठवतोय, तुझा पहिला स्पर्श अन ती ओली मिठी,

तो हळवा क्षण, ओल्या नदीकठी

भर पावसातही जाणवत होती, तुझ्या मिठीमध्ये ऊबदारी,

गार गार वाऱ्यातही, मनाला ऊभारी देणारा

असेनही मी, थोडासा रूक्ष, थोडासा कोरडा,

बराचसा व्यवहारी आणि अरसिकही तेवढा

पण, त्या कोसळणाऱ्या पावसातही तुझ्या डोळ्यातले पाणि मी ओळखले,

बाकी काही कळले नाही तरी, तुझे प्रेम मात्र उमजले