वदले जीवन

वदले जीवन एकदा मला
काय हवे ते बोल तुला

परी सारखी हवी नार
कि देवू धन अपरंपार
सत्ता प्रतिष्ठा घे हवी तर
बोल हवे ते देतो अपार

वदलो त्या मी त्याच क्षणी
भोग आकांक्षा आहेत मनी
स्वार्थ वासना कणोकणी
परत टाक त्या घेवूनी

आहेस दिले ते मज पुरे
अर्धे अधुरे ,नको अजून रे
मी हा असाच राहू दे रे
साथ फक्त तोडू नको रे

दु:खाने डोळे माझे भरू दे
प्रेमाने अंतर सदा फुलू दे
हृदयातील ओल नच आटू दे
प्रकाशाची द्वारं नच मिटू दे

विक्रांत प्रभाकर
दुवा क्र. १