तुझीच मिठी |

पुनवेच्या राती
सागरा भरती
ओठावर दाटली
उधान मस्ती |
रोमरोमी माझ्या
ओसंडे प्रीती
व्याकूळ काया
तुझ्याच साठी |
चांद भारल्या
सागरा काठी
दाटावी माझ्यात
तुझीच मिठी |

विक्रांत प्रभाकर
दुवा क्र. १दुवा क्र. २