एक माणूस

तुटले जरी सारे जग
एक माणूस तुटू नये
खोल खोल आपल्यात
आपण उरी फुटू नये

गच्च भरता वर्षा ऋतू
पाणी कमी पडणार नाही
जळणाऱ्या दिवसात पण
घागर कुणी ओतणार नाही

मध्यरात्री संसाराच्या 
घराचा दिवा विझवू नको
वेडेपणा करून काही
वनात काठी हरवू नको

एक ओंजळ प्रेमाची
तिच्यासाठी फक्त ठेव
शिणून भागून येता ती
केसावरून हात फिरव

विक्रांत प्रभाकर
दुवा क्र. १