( उपहास )
स्वातंत्र्य भारताचे
कशाला प्रश्न हा ' स्वातंत्र्याने आम्हा काय दिले ? '
किड्या-मुंग्यापरी हे पण 'जगायला' तर दिले
वाटत असेल जरी हे राज्यही माफियांचे
होत नाही का यातून दर्शन 'बंधुत्वाचे ! '
असेल ईथे भ्रष्टाचार अन् घोटाळेबाजी
आहे 'कमावने' हा मुलभुत हक्क का नाराजी ?
असेल ईथे बेरोजगारी अन् महागाई
अपराध पोटी घेण्याची मिळते ना पुण्याई
होतातही ईथे बालमृत्यू अन् भुकबळी
त्यानेही भाजत असेल ना कुणाची पोळी
करीत असेल ईथे शेतकरी आत्महत्या
त्यानेही महाली कुणाच्या पेटतात ना बत्त्या
असेलही ईथे अर्थ स्वातंत्र्याचा स्वैराचार
बंधनमुक्तीच्या हर्षात नाही का पुण्य फार ?
विझू द्यायचे नाहिच कधी दिप आशेचे
म्हणू ' आ चंद्र-सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे '
- उद्धव कराड, ( मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.