नवलकोल ची भाजी

  • मध्यम आकाराचे नवलकोल - तीन नग
  • मुग डाळ अर्धा तास भिजवलेली - अर्धी वाटी
  • फोडणीसाठी तेल, मोहोरि, जिरे, हळद
  • हिरव्या मिरच्या - तीन ते चार
  • कढिपत्ता पाने - दहा ते बारा
  • हिन्ग - एक छोटा चमचा
  • मीठ - चविप्रमाणे
  • साखर - चिमुट्भर
  • ओले खोबरे व चिरलेली कोथिन्बिर
२० मिनिटे
चार जण

नवलकोल सोलून जाड किसून घ्यावा.

तेल गरम करून त्यात मोहोरी आणि जिरे घालून तडतडवणे
आता फोडणित कढीपत्ता , मिरच्यांचे तुकडे, हिंग घालून परतणे
त्यात भिजवलेली मुग डाळ आणि हळद घालून परतणे आणि मग किसलेला नवलकोल घालणे
आता सगळे नीट ढवळुन, परतून त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ देणे.
नंतर त्यात चविप्रमाणे मीठ, साखर घालून ढवळणे.
परत एकदा झाकण ठेवून भाजी शिजवावी.
साधारण कोबिच्या भाजिप्रमाणे पोत झाला कि भाजी झाली असे समजावे.
शेवटी खोबरे, कोथिंबिर भुरभुरावून सजवावी.

साधारण कोबिच्या भाजी सारखी लागते. त्यामुळे कोबीच्या भाजीचा पोत आपण जसा ठेवतो तसा ह्या भाजीचा ठेवावा असे म्हटले आहे.. 

 (हिमाचल, उत्तर प्रदेश वगैरे ठिकाणी नवलकोल ला गांठगोबी म्हणतात!
 त्याची काश्मिरी लोक पाल्यासकट वापरून एक रस भाजी करतात...त्याची पाककृती परत कधी तरी...)
माझी आई