मी आणि तू (१)

'मी' पण हे माझे
बरवे हो साचे ।
दुज्याचे ते सारे
व्यर्थ असे ॥

माझे ते चारित्र्य
मूर्त हे पावित्र्यं ।
दुज्याचेच मात्रं
भ्रष्टं असे ॥

      तुझे अनाचार
(ते) माझे सदाचार । 
      कारण विचार
     त्यात असे ॥

करितो बचत
मी असे शहाणा ।
कंजुसी बहाणा
तुझा असे ॥

माझे परिपक्वं
विचारांचे सत्वं । 
तुझे ते कवित्वं
मूढ असे ॥

माझीया विचारा
सोन्याची झळाळी । 
तुझी  काजळाली  
मती असे।।
मी एक शहाणा
दृढ माझा बाणा । 
बाकीचे ठणाणा
करीतसे ॥

 
(क्रमशः)