३ गोलकीपर ...

३ गोलकीपर...
टाळ्यांचा कडकडात होत होता.. मी थंड उभा होतो..
मन भरभर धावत काही तास मागे गेलं..
मी माझ्या football संघा चा राखीव खेळाडू होतो.. सामना सुरू झाला.. दोन्ही संघ मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकले... आमचा गोलकीपर गोल जवळ तयारीत उभा होता.. तसा च त्यांचा हि..!!
शिट्टी झाली.. खेळ सुरू झाला.. अचानक भरधाव पणे सगळ्या वातावरणा ने वेग पकडला!!! डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच ball एका खेळाडू कडून दुसर्या खेळाडू कडे फिरत होता..., एका क्षणात काय घडले
देवास ठाऊक.. प्रतिस्पर्धी ball सकट आमच्या गोल जवळ येऊन पोचले.. मला बसल्या जागे वरून आमच्या गोलकीपर चे पाय थरथरताना दिसले!!
पुढच्या च क्षणाला प्रतिस्पर्ध्यांनी गोल च्या दिशेने ball ढकलला.. आमच्या गोलकीपर ने  प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला, त्यात त्याला दुखापत झाली.., सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला आमचा गोलकीपर जखमी आणि आमच्या वर एक गोल!!!
आमच्या प्रशिक्षक सरांनी मला गोलकीपर म्हणून धाडलं...
मी सज्ज झालो.. गोल जवळ जाऊन उभा राहिलो.. काळीज धडधडत होतं.. पण थोड्या वेळाने मी स्तीरस्थावर झालो.. मग मला जाणीव झाली कि माझा संघ इतका चांगला खेळतोय कि प्रतिस्पर्धी खेळाडू ball
घेऊन माझ्या पर्यंत पोचूच शकत नव्हते!! मध्यंतरानंतर मात्र परिस्तिथी तोडी चिंता जनक झाली.. कारण त्यांचा गोलकीपर ला आमचे खेळाडू भेदू शकले नव्हते, आणि आमच्या वर पहिल्या मिनिटाचा गोल होता.
खेळ संपत आला होता आणि मी थंड उभा होतो माझ्या गोल चा एक खांब पकडून.
शेवटी सामना संपला.. प्रतिस्पर्धी संघ जिंकला होता.. त्यांचे खेळाडू जल्लोषात उड्या मारत होते.. माझा संघ निराश होऊन माना खाली घालून बसला होता आणि मी थंड उभा होतो!!
नंतर पण मी थंड च उभा होतो.. टाळ्यांचा कडकडात चालला होता.. प्रतिस्पर्धी संघा च्या गोलकीपर चे कौतुक होत होते.. मी जिकडे उभा होतो तिथून प्रेक्षक फार लांब नव्हते!!
मी तिकडे बघितलं, एक जण माझ्या दिशेने तर्जनी दाखवत म्हणाला, "तो बघ.. पराभूत संघाचा गोलकीपर " !! माझ अंग शहरला गेलं.. मी बक्षीस समारंभा कडे पाहिलं.. प्रतिस्पर्धी संघाचा गोलकीपर बक्षीस स्वीकारत
होता.. त्याने एक नजर माझ्या कडे टाकली, ती नजर मी स्पष्ट वाचू शकलो.. त्यात सहानुभूती होती : "मी समजू शकतो!! ", त्या च क्षणी मी पलीकडल्या बाजूस आमच्या जखमी गोलकीपर कडे पाहिलं त्याने हि माझ्या कडे एक नजर
टाकली, त्यात ले भाव सुद्धा स्पष्ट  होते, त्यात याचना होती : " मला माफ कर!! "
ह्या दोन नजरा मला यश अपयश ह्या पेक्षा खूप पुढे घेऊन गेल्या होत्या, तो क्षण फक्त आम्हा ३ गोलकीपर 'स चा होता!!
दोन टोकांचे हे गोलकीपर आणि त्यांच्या भिन्न नजरा घेऊन मी थंड उभा होतो!!!