पंतप्रधान मनमोहनसिंग यांस,

माननीय पंतप्रधान साहेब, आता पुढील वर्षी २०१४ मध्ये निवडणुका होतील. या वेळेचे निकाल पाहून कॉग्रेसला सत्ता मिळेल का असे सर्व म्हणतात . पण तरीही कदाचित मिळाली तरी कॉग्रेसचे पंतप्रधानपदासाठी  उमेदवार राहुल गांधीच  असणार आहेत  तेव्हा या वेळी  २६ जानेवारीला  तुम्हीच जनसागराला  संबोधित कराल तेव्हा तुम्ही  नवीन जाहीर करताना सर्वामधील भांडणे मिटावीत म्हणून प्रांत रचना भूगोल रचने प्रमाणे शासन करण्या स सोयीचे जावे अशी करण्याचे जाहीर करा व ज्याप्रमाणे प्रांतभेद मुळापासून काढून टाकण्यासाठी भौगोलिक परिस्थिती  चा अभ्यास  करून  घेणार  आहोत तसेच वर्ग भेद  समूळ उच्चाटनासाठी देखील  कोणत्याही वर्गाला  विशेष सवलत  दिली जाणार नाही  म्हणून कचेरीतील  नोंदीसुद्धा  फक्त भारतीय म्हणूनच असतील त्यामुळे जातीचा दाखला लागणार नाही. तसेच स्त्री म्हणून काहीही विशेष सवलत दिली जाणार नाही. तसेच राखीव जागा सुद्धा कोणालाच ठेवल्या जाणार नाहीत कारण आरक्षणा नंतर प्रगती खुंटावते हे मंडल आयोगाने आरक्षण वाढवायला सांगितले तेव्हा सिद्ध झालेच आहे.  अशा प्रकारची विधाने करून ज्यात आघाडीच्या राजकारणामुळे असे निर्णय जे घेता येत नाहीत ते जाहीर करावेत तसेच समान नागरी कायदा करताना जर एका धर्माला धर्मशास्त्रा मुळे जर सवलत असेल तर दुसऱ्या धर्मांनाही तशीच देऊ असे सांगावे म्हणजे जरी दुसरे आले तरी त्यांना (कॉग्रेस आली ) तरी त्यांना हे मत चटकन खोडता येणार नाही.