दुख

आजकाल लोक  दुःखच शोधत असतात
आपल्याकडे जे काही आहे, त्यापेक्षा आपल्याकडे जे नाही त्याला इतके का महत्त्व देतात.
आपल्याकडे जे नाही, ते हवे ह्या हव्यासापोटी आपल्याच माणसापासून इतके दूर का जातात.
आजकाल लोक  दुःखच शोधत असतात
आपल्यापेक्षा जास्त दुखी माणसे सभोवती असताना, सुखवस्तू माणसेच का शोधतात.
ते सुख आपल्याजवळ नाही, ह्याचा विचारात दिवसरात्र स्वतःलाच त्रास का करून घेतात.
आजकाल लोक  दुःखच शोधत असतात
का आपण दुसर्‍याचे दुःख पाहून, आपल्याजवळ ते नाही ह्यासाठी समाधानी होऊ शकत,
का आपण आपल्याकडे जे आहे, त्यात आपल्या माणसांबरोबर सुखाने आनंदाने राहू शकत. 
का ते सुख हवे म्हणून लोक हातचे सर्वस्व गमावून घेतात.
आजकाल लोक सुखापेक्षा, दुःखच जास्त शोधत असतात
                                                                            -- दीपक सैल