भेट

आता तर गोष्ट आपुली
इथवर येवून आहे ठेपली
आलीस तू अन गेली
मी चौकशीही न केली

नाही तसे सारे काही
विसरलो मी अजुनी नाही
पण स्मृतीचेच सांगाडे ते
जीव त्यात आता नाही

डोळ्यामध्ये तुझ्या पाहिले
भाव पाटी स्वच्छ पुसले
नव्हती त्यात ओळख कुठली
नव्हतेच जणु काही घडले

मग तो शिक्का सरकारी
ठपकन कागदावरी मारुनी
नेक्स्ट कोरडे तुज म्हणुनी
दूर सारीले मी नजरेपासुनी  

विक्रांत प्रभाकर
दुवा क्र. १