पाणी भरत आहे (नर्मदाकाठच्या कविता )

पाणी भरत आहे
तट बुजत आहेत
गावोगावचे देखणे
घाट बुडत आहेत
भांडून माणसे
थकली आहेत
रडून माणसे
थकली आहेत
हाती पडले ते
घेवून माणसे
दूरवर जावून
वसली आहेत
गाव पुन्हा
दिसणार नाही
शेत कधी ही
फुलणार नाही
मी खेळलो
ते अंगण शाळा
आता इथे
उरणार नाही
डोळ्यात दाटला
पूर द्वारकेतला
आता कधीच
आटणार नाही

विक्रांत प्रभाकर
दुवा क्र. १