वेदनांनी झोळी माझी सारी भरू दे रे

क़तील शिफ़ाई  (अनुवाद )

वेदनांनी झोळी माझी सारी भरू दे रे  अल्लाह
मग हवे तर मज पूर्ण वेडा होवू दे रे  अल्लाह

चंद्र कधी तारे तुज मी सांग मागितले होते
स्वच्छ हृदय सचेत नजर तू दे रे अल्लाह 

सूर्या सारखी वस्तू तर कधीच आम्ही पाहिली
आता खरोखरची एक प्रभात पाहू दे रे अल्लाह

या धरतीच्या जखमा वर लाव दवा  काही
वा माझे हृद्य हे पत्थर होवू दे रे अल्लाह
 
क़तील शिफ़ाई 

रुपांतर - विक्रांत प्रभाकर

दुवा क्र. १