गीत तिचे गातांना

दाही दिशांना मोद विहरतो गीत तिचे गातांना

अन अश्रुंचे घोट घोट मी गिळतो ती नसतांना
सायंकाळी समीप जेंव्हा ऐकाकीपण येते!
धावत येते सजणी माझी मिठीत मजला घेते
!! तिच असावी माझ्या सोबत जगताना मरताना !!
इतकी येते तिची नशा की तिलाच जग मी करतो
स्वप्नांमध्ये जगतो आणिक स्वप्नांमध्ये मरतो 
!! असे वाटते जाग न यावी कधीच तिज बघतांना !!
आली होती परीसारखी परी सारखी गेली
आसवांत या तेंव्हा माझ्या दुनिया ही भिजलेली
!! मला पाहतो असेच आता कधीतरी हसतांना !!