वैदर्भीय खसखस भाजी

  • चार मध्यम आकाराचे उभे कापलेले कांदे, अर्धी वाटी दोन तास भिजवून पाट्यावर बारीक वाटलेली खसखस
  • पाच लसूण पाकळ्या व पेरभर आलं वाटून, एक चमचा धणे व अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ तिखट व
  • कोथिंबीर बारीक चिरून
  • फोडणी - अर्धी वाटी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद
२० मिनिटे
चार जणांकरिता

 लोखंडी कढईत तेल टाकून फोडणी करावी. त्यात कांदा टाकावा व वाटलेलं आलं लसूण टाकावे. कांदा मऊ झाला की त्यात धणेजिरे पूड, बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर व तिखट टाकावे. दोन मि. परतल्यावर वाटलेली खसखस टाकून छान परतून घ्यावे व साधारण दोन वाट्या पाणी व  मीठ टाकावे,  पाच मि. भाजी शिजू द्यावी.  एका काचेच्या भांड्यात काढून वरून कोथिंबीर घालावी.

कांदा खरपूस होऊ देऊ नये.

 लोखंडी कढईव पाट्यावर  बारीक वाटलेली  खसखस,   भाजी ची लज्जत वाढवते.विदर्भाच्या  उन्हाळ्यात भाज्या कमी असतात तेव्हा खासकरून ही  भाजी केल्या जाते.

भाकरी बरोबर चांगली लागते.

मैत्रीण - मंगला