साबुदाणा प्रथम भिजवून घ्यावा. त्यासाठी एखाद्या भांड्यात साबुदाणा घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. सर्व पाण्याचा निचरा करून, भाड्यावर झाकण ठेवून एखादा तास ठेवावे. शक्यतो साबुदाणा मोकळा भिजवावा.
भिजवलेल्या साबुदाण्यात दाण्याचे कूट, किसलेला बटाटा, किसलेले आले, तिखट, मीठ, कोथिंबीर घालावी. त्यात २ चमचे तूप टाकून मळून घ्यावे. मध्यम आकाराचे साधारण ३-४ गोळे तयार करावेत.
एका पसरट तव्यावर प्रथम तूप लावून घ्यावे. मग त्यावर तयार केलेला गोळा हाताने थापावा. हाताच्या एखाद्या बोटाने थापलेल्या साबुदाण्यावर ५-६ भोके पाडावीत. त्यात थोडे तूप सोडावे. मग तवा गॅसवर ठेवून तव्यावर झाकण ठेवावे. चर्र आवाज आल्यावर आणि खालची बाजू लालसर भाजल्यावर उलटवावे. दुसऱ्या बाजूने थोडेसे भाजून ताटात घ्यावे आणि लिंबाचे लोणचे आणि दह्याबरोबर जिभेला आणि पोटाला तृप्त करावे.
पाककृती आवडल्यास जरूर कळवावे.
- हेमंत
नाही
आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.