जीवनखुणा...

कोण तू , जाणार कोठे ...

शोध का घेतो मनां ,

वासनांच्या जाळ्यातला ....

भ्रमर  तू जाण ना ,

घेशील किती गांभीर्याने ....

क्षणभंगुर जीवना ,

भेटले कित्येक , अजून भेटतील...

जपशील किती पाऊलखुणा ,

आप्त-मित्र , पुत्र-स्वकीय ...

प्रवासीच सारे , बांधसी किती बंधना,

मी न  म्हणतो कोणी मला कवी म्हणा ...

लेखिती मे उमजलेल्या जिवनखुणा .........