मंत्रिपदासंदर्भात हा बदल करावा का?

     शिवराज पाटील हे २००४ च्या निवडणुकीत पराभूत झालेले होते. कॉंग्रेसने त्यांना मंत्रिपद दिलेले होते. स्मृती इराणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. भाजपनेही त्यांना मंत्री बनविले  कारण पराभूत होऊनही मंत्रिपद देण्याची मुभा घटनेत आहे. तथापि, पराभूत झालेल्यांना मंत्रिपद दिल्यानंतर आगामी सहा महिन्यांमध्ये निवडून यावे लागते, अशी अट आहे. त्यामुळे इराणी यांना निवडून यावे लागेल.
    पराभूत झालेल्यांना मंत्रिपद देऊन नंतर निवडणूक जिंकण्याची अट घालणे, हे चमत्कारिक वाटते. त्यापेक्षा पहिल्या प्रयत्नात जिंकलेल्यांनाच मंत्रिपद देणे सयुक्तिक वाटते. तसा बदल घटनेत केला जावा का? या विषयाला इतर कोणते पैलू आहेत?