कणीक २ वाट्या, बेसन १/२ वाटी, जिरे, मिरे १ - १ चमचा
मीठ , तेल, तूप
१५ मिनिटे
२-३ जण
कणीक व बेसन एकत्र चाळावी. त्यात जिरे भाजून जाडसर वाटून व मिरी भरड कुटून टाकावे. तुपाचे मोहन घालावे. चवीनुसार मीठ घालून अर्धा तास भिजवून ठेवावे. नंतर, घडीच्या पोळ्या करतो (दोन तीनदा फोल्डस करुन) त्याप्रमाणे पराठे त्रिकोणी आकारात लाटून तव्यावर तेल सोडून खुसखूशीत भाजावेत. ताजे लोणी, लिंबाचे लोणचे अथवा पुदिना चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.