असे हे कन्यादान

झीटीव्ही वरील मराठी मालिका, " असे हे कन्यादान " पाहत असताना एक चांगली गोष्ट लक्षात आली. तिचा आवर्जून उल्लेख करावसा वाटतो. श्री. सदाशिव कीर्तने ( श्री. शरद पोंक्षे ) यांच्या कार्यालयात, ते ज्या खुर्चीवर बसतात, त्याच्या मागे, भिंतीवर श्रीभगवद्गीतेच्या १६ व्या अद्ध्यायातील
१ ल्या श्लोकाची पहिली ओळ मोठ्या अक्षरांत लिहिली आहे. ती ओळ आणि तिचा अर्थ पुढे देत आहे." श्री भगवानुवाच " " अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः " श्री भगवान म्हणाले, " निर्भयता, पूर्ण सात्त्विक वृत्ती, ज्ञान व कर्मयोग या दोहोंविषयी तत्परता. "  भगवंतानी १६ व्या अध्यायातील पहिल्या तीन श्लोकात एकूण २६ दैवी गुण ( या शब्दाचा उच्चार गूण् असा करू नये ) सांगितले आहेत. श्री. सदानंद कीर्तने या व्यक्तिरेखेत हे गुण परिपूर्ण भरलेले आहेत. हा श्लोक त्या योग्य जागेवर लिहिण्यास सुचवले त्या व्यक्तीचे खरोखरच कौतुक करावेसे वाटते. त्या व्यक्तीचे नांव, मोबाईल, ईमेल कोणी पाठवू शकेल का?