पुण्यात केसांवरील चांगले उपचार कोठे उपलब्ध आहेत..

माझ्या मुलीसाठी (वय १३) सध्या मी चांगला डॉक्टर शोधत आहे, केसगळती आणि कोंडा (स्काल्फ) यावर उपचारासाठी! कोणत्याही उपचारपद्धतीतला असेल तरीही चालेल पण शक्यतोवर आयुर्वेदिक आणि होमिओपथी उपचार करणारा डॉक्टर प्रीफरेबल. 

कुणीतरी सांगितलं म्हणून डॉक्टर बालाजी तांबे यांच्या कार्ल्यात तपास केला; पण तिथे फक्त पंधरा दिवस, २२ दिवस आणि ३० दिवस असे प्रोफेशनल पंचकर्म पैकेज आहेत, तेही निवासी... त्यात फी अवाच्या सव्वा ... मिनिमम पैकेज ४० हजार तरी !!  फक्त केसांवर असे उपचार नाहीत ...औषधे असतील तर नीट माहितीही देत नाहीत ... पुण्यात शिवाजीनगरात त्यांचे एक केंद्र आहे पण तिथे डॉक्टर तांबे येत नाहीत .. 
काय करता येईल?? पुण्यात केसांवरील चांगले उपचार कोठे उपलब्ध आहेत, कुणी कृपया मार्गदर्शन करेल का? ... लेक बिचारी वैतागलीय ... खूप उपचार झाले ट्राय करून; घरगुती, आजीबाईचा बटवा ... आणि अजून अनेकांचे बटवे !!! 
'मनोगत'वर काहीतरी ठोस आणि उपयुक्त मदत मिळेल, ही आशा...