अरुण फडके यांचं निधन

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील अरुण फडके यांच्या निधनाची ही बातमी धक्कादायक म्हणावी लागेल.

दुवा क्र. १

शुद्धलेखनाचा केवळ आग्रह धरून चालणार नाही. ती सवय झाली पाहिजे, असे ते नेहमी सांगत.  त्यांचे 'शुद्धलेखन ठेवा खिशात' हे पुस्तक माझ्या खिशात नाही तरी संग्रहात आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तीचे निधन ही नक्कीच चटका देणारी बातमी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.