मनोगत : नव्या अडचणी आणि नव्या योजना

पहिल्याच वाक्यात सांगायचे तर पुढील काही काळ मनोगत दिसेनासे होईल.

मनोगतासाठी वापरलेली ड्रुपल सॉफ्टवेअरची आवृत्ती आता कालबाह्य झालेली आहे. ती ड्रुपलची आवृत्ती ज्या पीएचपी सॉफ्टवेअरवर आधारित आहे तीही कालबाह्य झालेली आहे. तरीही सेवादात्याने तिला आतापावेतो आधार दिलेला होता; परंतु हे सर्व ज्यायोगे नियंत्रित केले जाते ते सी-पॅनेल  सॉफ्टवेअर यापुढे जुन्या आवृत्त्यांना आधार द्यायला तयार नाही, त्यामुळे आता सेवादात्याचाही नाइलाज झालेला आहे, आणि नव्या आवृत्त्यांशी जुळवून घेणे अनिवार्य झालेले आहे.

आपण मनोगतावर कितीतरी वेगवेगळ्या सुविधा विकसित केलेल्या आहेत त्यांना नव्या आवृत्तीसमवेत जुळवून घेताना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि त्या निवारल्या जात आहेत; मात्र हे सर्व काम वेळाशी चाललेल्या शर्यतीत पुढील काही काळ मागे पडेल अशी चिन्हे दुर्दैवाने दिसत आहेत.
१ फेब्रुवारी २०२१ पासून सध्या दिसत असलेले मनोगत दिसेनासे होईल आणि त्याजागी काही तात्पुरत्या लेखनसुविधा निर्माण केल्या जातील.
मनोगतावर असलेला मजकूर शाबूत आहे आणि नव्या स्वरूपात मनोगत अवतीर्ण झाले की तो पुन्हा नक्कीच वाचता येईल, मात्र त्याला किती वेळ लागेल ते आताच सांगता येत नाही.
नव्या स्वरूपातील मनोगत त्याच्या एकेक सुविधा घेऊन क्रमाक्रमाने पुन्हा कार्यान्वित होईल ह्याची खात्री आहे.
सुधारणेच्या कामाच्या प्रगतीची माहिती येथे कालक्रमाने देण्याचा मानस आहे.
काळ, काम आणि वेग ह्यांचे गणित जसजसे सुटत जाईल त्याप्रमाणे त्याचे उत्तर दिसू लागेल.