मोड आलेले मूग एक पाव, कोथिंबीर मूठ्भर, आले लसूण पेस्ट, कोवळी मेथी चिरुन वाटीभर, तिखट, मीठ
ब्राऊन ब्रेड, बटर, पुदीना कोथिंबीर चटणी, केचप
५ मिनिटे
३-४ जण
मूग मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.
त्यात मेथी, कोथिंबीर, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, तिखट मीठ टाकून नीट मळून घ्या.
त्याचे चपटे चौकोनी वडे (साधारण ब्रेड स्लाईस च्या आतल्या साईझ चे) करुन तव्यावर शॅलो फ्राय करून घ्या दोन्ही बाजूने लालसर सोनेरी रंग येइपर्यंत.
ब्रेड चे स्लाईस तव्यावर कोरडेच भाजून घ्या.
मग खाली ताटलीत घेऊन त्यावर बटर, पुदीना चटणी, कांदा टॉमॅटो काप, काकडीचे दोन काप व वर टिक्की ठेवून वर दुसरी स्लाईस ठेवा.
जरासे दाबून सँडविच मधून तिरके कापा.
सॉस सोबत गरम सर्व्ह करा.
सकाळच्या प्रोटीन युक्त नाश्त्याचा पर्याय!
स्वतःचे प्रयोग
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.