दोन थेंब (आगरी)

दोन थेंब

प्रेषक रत्नाकर अनिल (गुरु., १६/०५/२०१३ - ०८:३३)

दोन थेंब आकाशान लागले तक्रार कराला
तवऱ्यान तीथे बापुस ढग अला
बोतला, क होला र झगरा कराला?
एक थेंब बोतला,
मना नाय पराचे जिमीनीवर

मना ऱ्हाउ दे हीथच
तु तरा कसा बाप हायेस? 
पोटच्या पोराला घराबायेर कारतोस
मी नव्या विचाराचा हौ
कईतरी नवा करू दे मना

ढगाच्या डोल्यान पानी अला
आर बाबानो, त्येच हाय आपल्या कर्माला
पोटची प्वार नाय, सासरी जातो आन संसार फुलवितो
रागान वहाल तर इस्कोट व्हईल
प्रेमान जाल तर बहार येईल

दोल्यानचा पानी पिउन टाका
आन उगा कोनाच्या डोल्यान पानी आनू नका
आपन अपला काम करावा

त्या शक्तीमान सुर्व्याला मी झाकतो 
पन त्यो वारा मन ढकलून देतो 
मी क करू शकतो?
पन त्येलाबी डोंगर अरवतो
आन त्या डोंगराला बी ऊंदीर पोखरतो
ह्यो असाच असतो र बाला
चंगला करावा, चंगलाच व्हईल

मंजुल गानी समद्यास्नी आवरतान
ऊगा भांडने, झगरे, लफरी सगला बेकार
आर तुझ्या येका थेंबान 
धरती हिरवी व्हईल 
कैक संसार हुभे ऱ्हातील

आता, माझ्या लेकरांनो 
तुमीच ठरवा, का
नाल्याच्या शिरीमंतीला भुलाचे
का झऱ्याच्या निर्भरासवे रमायचे

*अनिल रत्नाकर*