शिवजन्मोत्सव आणि मनातील काळजी

शिवजन्मोत्सव!

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी जवळ येत असताना सोशल मीडियावर शिवभक्तांचा कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्याच अनुशंघाने आलेल्या विचारांना कागदावर उतरविण्याचा हा प्रयत्न! 

शिवछत्रपतींभोवती असलेले वलय अगदी न्याय्य असेच आहे. असे शहर निदान महाराष्ट्रात नसेल की जेथे महाराजांचा पुतळा, त्यांच्या नावाचे नगर, रस्ता अथवा एखादे उद्यान नाही. पुणे शहराच्या तर महानगरपालिकेचा लोगोमध्ये देखील शिवराय आहेत. आज महाराष्ट्रात असा लोकप्रतिनिधी नसेल की जो सामान्य जनतेला संबोधताना शिवरायांचा उल्लेख करत नाही. 

दिवसेंदिवस उफाळून येणाऱ्या राष्ट्रप्रेमासोबतच जोडून शिवरायांवरील प्रेम व्यक्त करण्याची स्पर्धाच जणू समाजामध्ये लागलेली दिसते. "जगदंब" लिहिलेला स्वेटशर्ट, जवळ जवळ साऱ्याच टॅक्सींवर रेडिअमने कोरलेले शिवछत्रपतींचे लोकप्रिय चित्र, शिवमुद्रा असलेली आभूषणे, "जाणता राजा"चे झेंडे लावलेल्या मोटार सायकलींचे घोळके, गळ्यावरील शीर ताणून महाराजांचा केलेला जयघोष, ढोल ताशांच्या पार्श्वसंगीताचे व्हॉटसअप स्टेटस, भलेमोठे बॅनर्स हे सारे सवयीचे, नित्याचेच झाले आहे. 

आणि खरे म्हणजे चालत यायला हवे हीच सदिच्छा! पण नेमके ह्या सगळ्याच्या भविष्याबद्दल मला - एक पालक म्हणून - लागून राहणारी काळजी आज व्यक्त करण्याच्या निर्धाराने लिहीत आहे. 

आपण लाख करू हो शिवछत्रपतींच्या नावाचा उद्घोष, पण कधी विचार केला आहे का आपण की येणारी नवी पिढी तो वारसा चालू ठेवेल ह्यासाठी आपण कोणती ठोस पाउले उचलतो?
आज शिवछत्रपतींचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचावा म्हणून कोणती माध्यमे उपलब्ध आहेत? 
इतिहासाची पुस्तके पाहावीत तर आधुनिकीकरणच नावाखाली "आपला" असा जो इतिहास आहे तो तर काढूनच टाकला आहे!
सिबीएससीच्या अभ्यासक्रमात अकबर राजाच्या खाली एका परिच्छेदात संपवतात शिवछत्रपतींचा इतिहास, आयसिएससी नावाच्या एका शिक्षणपद्धतीमध्ये तर महाराजांच्या ऐवजी फ्रेंच राज्यक्रांती शिकविली जाते.
चित्रपट आणि मालिकांमध्ये दाखवला जाणारा इतिहास एकतर एखाद्या ऐतिहासिक घटनेवर बेतलेला असतो किंवा त्याचे बेछूट नाट्यरुपांतरण केलेले असते.
बरं वयाची ४०-४० वर्षे शिवचारित्र्याचा अभ्यास करून इतिहास संशोधकांनी लिहिलेले भलेमोठे शोधग्रंथ जिथे तुम्ही-आम्हीच नाहीत वाचले तिथे ही ३० सेकंद "रील"वाली पिढी कुठून वाचणार? 

म्हणजे तात्पर्य काय तर शिवचारित्र्याची तुम्ही-मी, जाणून किंवा अजाणतेतून, जी आराधना करतो ती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, आपल्या लहान मुलां-मुलींपर्यंत पोहोचावी ह्यासाठी कोणतेही विश्वासार्ह असे माध्यम एकविसाव्या शतकात उपलब्ध नाही!
आणि होय, मला ह्याची प्रचंड काळजी वाटते! 

महाराजांच्या नावाने केले जाणारे राजकारण, मुर्त्यांच्या विटंबनेतून घातला जाणारा सावळा-गोंधळ, गडदूर्ग़ांची होत असलेली अवहेलना, शिवछत्रपतींच्या नावाचा सर्रास होत असलेला गैरवापर ह्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही! पण आपला अस्सल असा इतिहास, प्रेरणादायी पद्धतीने नव्या पिढीपुढे आणण्यासाठी आपण काहीच करत नाही आणि शिवरायांबद्दल आपण व्यक्त करत असलेले प्रेम ते होण्यासाठी कसे निरुपयोगी आहे ह्याची जाणीव कोणत्याच बुद्धिजीवी व्यक्तीला, शिवप्रेमींना, लोकप्रतिनिधींना, प्रशासनाला आजवर कशी झाली नाही? हा विचार मला अस्वस्थ करतो?

वाचकांना आत खोल कुठेतरी वाटले नक्की असेल, आणि नसेल तर आता अंतर्मुख होऊन विचार केल्यास मी उपस्थित करत असलेल्या प्रश्नाचे गांभीर्य त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल अशी माझी माफक अशी अपेक्षा आहे. आणि फक्त प्रश्न उपस्थित करून रजा घ्यावी असा निश्चित विचार नाही माझा, माझ्याकडे ह्यासाठीचे अस्सल उत्तर आहे!

_________________________________________________________________________________________________________

चर्चगेट, मुंबादेवी, क्रॉफ़र्ड मार्केट हे शब्द त्या जागांवर प्रत्यक्ष जाऊन भेट न देताही सर्वसामान्यत: सर्वांना "नवा व्यापार" ह्या खेळातून भेटले होते. अगदी २०-२२ वर्षांपूर्वीच.. 

अचानक विषयांतर नाही करत आहे मी, मुद्दा एव्हढाच की लहानपणी खेळता खेळता काही गोष्टी अगदी कसलीही घोकमपट्टी न करता लक्षात राहतात!
आता कल्पना करा, की जर शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जर त्यांचा एक मावळा बनून खेळता खेळता अनुभवता आला तर?
रायरेश्वर मंदिर कुठे ही असू देत पण तिथे शिवरायांसोबत तुम्हाला ही असता आले तर, आणि तिथे असल्याबद्दल वर बक्षीस मिळाले तर?
स्वप्नवत वाटते ना? 

पण हे होऊ शकते - मावळा नावाचा एक खेळ खेळता खेळता! मावळा नावाच्या एका खेळाबद्दल तुम्ही ऐकले असेल अथवा नसेलही कदाचित, पण पूर्वार्धात उपस्थित केलेल्या अस्वस्थ करून सोडणाऱ्या प्रश्नांवर गेल्या लॉक डाउन मध्ये काम करून काही पालकांनी मुला-मुलींपर्यंत आपला गौरवशाली इतिहास पोहोचवण्यासाठी मावळा ह्या बोर्ड गेमची निर्मिती केली. खेळ म्हणावा तर अगदी सोपा, पण फार मोठ्या उद्द्येशाने बनवलेला!
ह्यामध्ये एक बोर्ड आहे ज्यावर आहेत १०१ घरे! प्रत्येक घर शिवछत्रपतींच्या आयुष्यातील एक घटना आहे.
तुम्ही शिवरायांच्या सैन्यातील एक मावळा बनून फासे फेकत चांगल्या वाईट घटनांवरील हा प्रवास करता.
बक्षिसे मिळवता, स्वराज्य कार्यात छत्रपतींना साथ दिलेल्या २० योद्ध्यांची साथ थेट तुम्हाला मिळते, १० दूर्ग तुमच्या संरक्षणाला येतात, तुम्हाला संपन्न करतात.
तुम्ही स्पर्धा करता सोबतच्या इतर मावळ्यांशी - खेळाडूंशी - की कोण जास्तीत जास्त संपत्ती राज्याभिषेकाला शिवरायांच्या चरणी स्वराज्यात अर्पण करतो ह्याची! जो तसे करू शकतो, तो जिंकतो! 
इतका सोपा पण अभिनव खेळ आहे हा! 

अफ़झलाच्या पोटापासून ते शाहिस्त्याच्या बोटावर शिवरायांचा सारा इतिहास गोळा करून सोडून देणाऱ्या अगदी आपल्या पिढीलाही हा खेळ अनेक नव्या गोष्टी शिकवून जातो. खेळता खेळता कोणत्या स्वराज्ययोद्ध्याचे कर्तृत्व कोठे कोठे?, कोणत्या दुर्गांवर कोणकोणती घटना घडली हे सारे तुम्हाला नको असले तरी हा खेळ शिकवून जातो. एखाद्या मोहिमेत कमावलेले सारे परप्रांतीय सरदाराच्या आक्रमणामुळे हातचे गेले की आपोआपच लक्षात यायला लागतं की शिवरायांनी उभारलेला स्वराज्यलढा कसा धगधगता यज्ञच होता जणू. अफ़झल खान, शाहिस्ते खान आणि सिद्दी जौहर अशांचे स्वराज्यावर चालून येणे मग खरोखर त्रासदायक होते, आणि तान्हाजी येसाजी सुर्यरावांसारख्या खऱ्याखुऱ्या स्वराज्ययोद्ध्यांची साथ मिळणे कमालीची धमाल आणते हा खेळ खेळताना... 

तान्हाजींपूर्वी ३-३ वेळा सिंहगड मिळवणारे - बापूजी;
वयाच्या ६५व्या वर्षी लढता लढता स्वराज्यासाठी देह ठेवणारे - बाजी पासलकर,
किंवा थेट शिवरायांच्या पंचाग्निंपैकी एक म्हणवला गेलेला - रामजी पांगेरा
ही मंडळी भेटली की लक्षात यायला लागत की आपल्याला वाटले होते तेव्हढे आपल्याला माहीत नाही शिवरायांबद्दल...
खेळा सोबतची माहीतीपुस्तके लहानांनाच काय तर मोठ्यांना देखील बऱ्याच नव्या पण अस्सल गोष्टी शिकवून जातात अगदी खेळता खेळता.. 

मावळा हा बोर्ड गेम, शिवरायांचा अस्सल इतिहास आपल्या नव्या पिढीपर्यंत आपल्या गौरवशाली इतिहास पोहोचवण्यासाठी असलेल्या माध्यमांची उणीव सक्षमपणे भरून काढतो. बहुधा म्हणूनच भारत सरकारने १९००० संकल्पनांतून मावळा ह्या बोर्ड गेमची निवड सर्वोत्कृष्ट म्हणून केली असावी. छत्रपती शिवाजी महाराज की असं कोणी म्हणाल्यावर जर हवेत जाणाऱ्या मुठीला खरोखर अर्थ द्यायचा असेल प्रत्येकाने खेळावा असा हा एक अस्सल मराठी आणि अभिनव खेळ - मावळा - एक बोर्ड गेम!

www.themawala.com - अधिक माहितीसाठी!