आवाहन

मराठीतील ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचे २०२२ हे जन्मशताब्दी वर्ष. जीएंचे मराठी साहित्यातील योगदान लक्षात घेऊन २०२२-२३ या वर्षांत जी. ए. कुलकर्णी परिवार व इतर हितचिंतकांतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जी. एंच्या लेखनावर आधारित एकांकिका, जी. एंवर केल्या गेलेल्या लेखनाचे अभिवाचन, जी. एंवरील पुस्तकांचे प्रकाशन, जी. एंनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम या वर्षांत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतील अनेक ठिकाणी साजरे केले जाणार आहेत.

जी. एंच्या लेखनावर प्रेम असणारे एक रसिक या नात्याने या कार्यक्रमांसाठी आपणांस यथाशक्ती आर्थिक मदतीचे आवाहन करण्यासाठी हे पत्र लिहीत आहोत.

आपण आपली मदत- ००४०५०१०१३६१४३ ,The cosmos co op bank ltd, कोथरुड शाखा, आय एफ़ एस सी कोड: COSB0000004 या खात्यावर जमा करावी अशी आपणांस नम्र विनंती आहे.रक्कम जमा केल्याचे कृपया ९८२३१७९५९७ या WhatsApp क्रमांकावर कळवावे.कळावे, लोभ असावा, ही विनंती.

सुनीता (नंदा) पैठणकर
डॉ. संजीव कुलकर्णी
कृष्णा निकव