अंड्यांची कोशिंबीर (एग सॅलड)

  • दोन उकडलेली अंडी
  • दोन उकडलेले बटाटे (साधारण अंडयांच्या आकाराचे)
  • एक कांदा (साधारण मोसंब्याच्या आकाराचा)
  • मीठ, मिरपूड (चवीप्रमाणे)
  • मस्टर्ड (तीन टेबलस्पून)
  • खमंग भाजलेल्या दाण्यांचे कूट (अर्धी वाटी)
  • मेयॉनीज (दहा टेबलस्पून)
३० मिनिटे
दोन जणांसाठी सकाळच्या खाण्याला

कांदा मध्यम कापून घ्यावा.

त्यावर चवीपुरते मीठ नि एक चमचा मस्टर्ड घालून नीट मिसळावे.

उकडलेले बटाटे मध्यम कापून त्यात घालावे.

त्यात चवीपुरते मीठ नि एक चमचा मस्टर्ड घालून नीट मिसळावे.

उकडलेली अंडी बारीक कापून त्यात घालावीत.

त्यात चवीपुरते मीठ नि एक चमचा मस्टर्ड घालून नीट मिसळावे.

त्यात दाण्याचे कूट घालून नीट मिसळावे.

मिरपूड आणि मेयॉनीज घालून नीट एकत्र करून घ्यावे.
सोबत कणकेचा पाव (होलव्हीट ब्रेड) भाजून द्यावा.
स्वप्रयोग