कॅनडात पानटपऱ्यां सारखी विद्यापीठे गल्लोगल्ली निघालीयेत. सर्वच विद्यापीठांची फॅक्टचेक होणे गरजेचे आहे.
शैक्षणिक कर्जाच्या नावाखाली बराच पैसा आपण भारतातून कॅनडात पाठवतोय पण पान टपऱ्यांवर जशी विमलची पूडी आरामात मिळते तशी असल्या विद्यापीठांची प्रमाणपत्रे गल्लोगल्ली चण्याच्या पुड्यांसाठी दोरीला बांधली जात असावीत !
बरं, शिक्षण घेतांना भारतातल्या पोरांना नोकर्या कसल्या मिळतात तर, दुकानातल्या सफाई कामगार किंवा फार तरं हॉटेलात टेबले पुसायची !!
पुढे ? शिक्षण पूर्ण केल्यावर ? साठ सत्तर लाखांची कर्जे फेडणार कशी ?
नोकरीच्या आशेने पोरं कॅनडात बसून असतात आणी त्यांचे मायबाप पोरांना नोकरी लागेल ह्या आशेवर भारतात !!!
सिस्टम क्रॅश्ड चा मेसेज मॉनिटरवर यायच्या आधी, लोड कमी करणे गरजेचे आहे. ताबडतोब कॅनडासाठी शैक्षणिक कर्जे देणे बॅंकांनी बंद करावीत ?
आपला काय विचार आहे ?