दोन हजार रुपयाच्या नोटा

आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नमूद केलेल्या आरबीआयच्या नियमांनुसार, तुमच्याकडे 2000 च्या चलनी नोटा असल्यास आणि त्या तुमच्या खात्यात जमा करायच्या असल्यास, तुम्ही भारतातील "कोणत्याही" पोस्ट ऑफिसद्वारे ते करू शकता. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरच उपलब्ध असलेल्या विहित नमुन्याच्या अर्जासोबत आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींपैकी कोणतेही एक कागदपत्र आणि खाते तपशील जोडणे आवश्यक आहे. मला खातरी करायची आहे कि "कोणत्याही" पोस्ट ऑफिसमधून, अगदी आडगावच्या, पोस्टांतून हे करता येते का? कोणत्याही मनोगतीने हे कधी केले आहे का?