पालक बटाटा

  • पालक एक जुडी
  • उकडलेले बटाटे पाव किलो
  • लसूण पाच पाकळ्या
  • टोमॅटो प्युरी/केचप/सॉस दोन टेबलस्पून
  • तेल
  • मोहरी, हळद, हिंग, मेथीदाणे, जिरेपूड, गरम मसाला, मीठ
  • कोथिंबीर
  • फ्रेश क्रीम / टेबल बटर
दीड तास
दोन जणांसाठी

पालक निवडून घ्यावा. पाने वाफवून घ्यावीत. त्यासाठी कढईमध्ये पाने ठेवून वर झाकण ठेवून मंद आचेवर पाने मलूल पडेस्तोवर ठेवावे. मग मिक्सरमधून काढून प्युरी करून घ्यावी.

लसूण सोलून आणि ठेचून घ्यावी.

बटाटे उकडून मध्यम चिरून घ्यावेत.

तेल धुरावल्यावर ज्योत बारीक करून फोडणीत मोहरी, मेथीदाणे, लसूण, हळद, हिंग याच क्रमाने घालून चिरलेले बटाटे घालावेत. जिरेपूड, गरम मसाला नि मीठ घालावे. मग टोमॅटो प्युरी (वा जे असेल ते) घालून एकजीव करावे. मध्यम आचेवर आठ ते दहा मिनिटे परतावे. बटाटे खाली खरपूस व्हायला हवेत.

पालक प्युरी घालावी. गरजेनुसार गरम पाणी घालून सारखे करावे.

मंद आचेवर एक उकळी येऊ द्यावी.

चिरलेली कोथिंबीर घालून दोन मिनिटांनी ज्योत बंद करावी.

वरून फ्रेश क्रीम/टेबल बटर घालावे.