मला वाटते की, हरियानासारखेच धृवीकरण होईल. मोदी विरोधक व मोदी
समर्थक असे दोन गट शिल्लक राहतील.
स्वत:ची विचारधारा सोडणारे म्हणजे उबाठा व अजीत पवार गट नामशेष व्हायला सुरवात होईल.
बाकी इतरांचे मतदार मोदी विरोधी अथवा मोदी समर्थकांत विलीन होतील.
हिंदू एकीकरणात वाढ होत जाण्याचा ४० वर्षांचा कल चालूच राहील.
मात्रबांगला देशांच्या घडामोडींचा मोठा परिणाम मतदानावर दिसून येईल. जो जम्मू व हरियाणात दिसून आलाय.
पंडितांना काश्मीर खोऱ्यातून हाकलून लावल्यावर देखील जम्मूत २०२४ अगोदरपर्यंत कॉंग्रेस ११-१२ जागा मिळवत असे. पण बांगला देश परिणाम एवढा तीव्र होता की कॉंग्रेस जम्मूतून संपून गेली.
तसेच हरियानामधे कॉंग्रेसने लोकसभेपेक्षा जास्त मते मिळवूनही ती हरली. कारण हिंदू व्होट बँकेत नव्याने भर पडली आहे. ती आणखीन मोठी झाली आहे.
२०१४ ला मोदींनी विकासावर मत मागितली होती. तसेच मोदी मुस्लिम विरोधी असल्याची टेप खूपच जुनी झाल्याने ती नीट वाजत नव्हती. परिणामकारक होत नव्हती. त्यामुळे मुस्लीम व्होटबँक विस्कळीत झाली होती. तर हिंदू व्होट बँक संघटीत झाली होती.
२०१४ ते २०१९ या कालावधीत हिंदू मुस्लीम वगैरे बाबत मोदींनी काहीच केले नसल्याने २०१९ ला मुस्लीम व्होटबँकेचा प्रभाव आणखी कमी झाला व मोदींचे यश आणखी वाढले.
मात्र त्यानंतर ३७०, ३५ए, तीन तलाक यामुळे मुस्लीम व्होटबँक परत पुनरूजीवीत झाली व २०२४ पर्यंत पूर्ण ताकदीने निवडणूकीत उतरली.
मात्र लोकसभेत ५६ खासदार पाठवायचा करिश्मा ती दाखवू शकली नाही. असा काही चमत्कार होईल अशा अपेक्षेत विरोधी पक्ष व काही परदेशी होते. पण तसे होऊ शकले नाही. कारण मुस्लीम व्होटबँकेचे महत्व मोठ्या प्रमाणांत कमी करण्या इतपत हिंदू व्होटबँकने मजल मारलेली होती. त्यामुळे २००४ प्रमाणे भाजपला १८० च्या खाली खेचण्याच्या कल्पना साकार झाल्या नाहीत. ते एक स्वप्नच ठरले.
आज हिंदू व्होट बँकेला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. ब्रीटन , जर्मनी सारखे देशही मुस्लीम अतिरेकाबद्दल बोलायला व हालचाल करायला लागले आहेत व या देशांची संख्या वाढत चालली आहे. हिंदू कम्युनिटी सौहृदाने जगणारी संस्कृती असल्याचे जगांत मानले जायला लागले आहे. बांगलादेशामुळे तर फारच मोठी वातावरण निर्मीती झाली आहे.
वरचे विवेचन खरे असेल तरलोकसभेपेक्षा विधानसभेला मतदान वाढायला पाहिजे. लोकसभेला मुस्लीम व्होट बँकेने पूर्ण ताकदीने मोदी विरोधात मतदान केलेले असल्याने ती ताकद आता आणखी वाढण्याची शक्यता नाही. मात्र हिंदू व्होट बँकेला वाढण्याला मात्र अजून भरपूर वाव आहे.
कोण कुठे उभे आहे, बंडखोरांचा परिणाम वगैरेकडे मी फारसे लक्ष देत नाही. कारण हिंदू संघटन वाढत जाण्याचा दार्घकालीन कल अबाधीत राहण्यासाठी योग्य माणसांना योग्य बुध्दी नियती देत असते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे राजकारणी डावपेचांना मी फारसे महत्व न देता ते डावपेच नियतीनेच तिच्या मनातले घडवण्यासाठी तयार केले आहेत असे मी मानतो. त्यामुळे मतदान टक्केवारीवरून दीर्घकालीन कल शोधणे महत्वाचे मानतो.
माझ्या हिदू मुस्लीम मतांवरून मी मुस्लीम विरोधी आहे की काय असे वाटेल. पण प्रत्यक्षात तसे नाही.
जगातल्या सर्व संस्कृती आचार विचार व धर्म गुण्यागोविंदानी एकत्र राहण्यासाठी सर्वसमावेशक व सर्व विचारांचा आदर करणारी हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे या मताचा मी आहे.
शरद पवार म्हणाले होते की लोकसभेसाठी महाराष्ट्रात मोदींची जिथे सभा झाल्या तिथे भाजप हरली. मोदींची सद्दी संपली असा सोयीस्कर अर्थ लावला गेला होता.प्रत्यक्षात ४००+ ची हवा निर्माण करण्याच्या नादात भाजपाला अनूकूल असलेले मतदान केंद्रावर फिरकले नाहीत. उलट मुस्लिम मते मात्र जास्त एकवटत गेली. असा दुहेरी परिणाम झालेला दिसतोय.
झालेली चूक भाजपा दुरूस्त करताना दिसतोय. तर लोकसभेच्या यशातच अजून विरोधक गुंतून पडले आहेत. असा दुहेरी परिणामामुळे भाजपाचा फायदा होताना दिसतोय. लोकसभेच्या बरोबर उलट होताना दिसतंय.
असं असेल तर लोकसभेला घटलेलं मतदान विधानसभेला वाढलेलं दिसलं पाहिजे. जम्मू काश्मीरमधे असं झालंय. हरियाणातही झालंय. आता महाराष्ट्राचा नंबर आहे. पण भाजप विरोघक या विचारांवर जोरदार हल्ला चढवत असल्याने त्यांचे मतदार अजून गाफील राहण्याची शक्यता आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मुस्लीम मतांचे एकीकरण पूर्ण झाल्याने ती मते आता वाढू शकणार नाही आहेत. मात्र हिंदू व्होट बँकेला वाढायला मात्र भरपूर वाव आहे.
हरियाणामधे कॉंग्रेसचं मतदान टक्केवारी लक्षणीयदृष्टा सुधारलीय. छोटे छोटे पक्ष संपून गेले आहेत. कॉंग्रेसच भाजपाला विरोध करू शकेल असं जनतेला वाटायला लागायचं लक्षण आहे हे. हे कॉंग्रेसला जाणवत होतं. नेहमीपेक्षा आपलं बळ वाढल्याचं जाणवल्यामुळेच आपण जिंकणार हे त्यांनी गृहीत धरलं होतं. त्यात काहीच चुकीचं नव्हतं. एक्झीट पोलही त्याच कलावर आधारीत होते.
पण हिंदू मत जास्त एकत्र आली कॉंग्रेसच्या वाढलेल्या मतांपेक्षा जास्त ३ टक्के मत भाजपकडे गोळा झाली.
भाजपाला कॉंग्रेसच तोंड देऊ शकतो या विचारातून हरियाणात कॉंग्रेसची टक्केवारी वाढलेली दिसते.तर मुस्लिमांच्या आततायीपणावर भाजपच नियंत्रण ठेऊ शकतो असंवाटल्याने जम्मूत भाजपकडे मते एकवटली.
पंडीतांना काश्मीर खोऱ्यातून हुसकावून लावलं तरीही जम्मूमधे कॉंग्रेसला जागा मिळत असत. पण बांगलादेशामुळे भारतात जोरदार धृवीकरण सुरू झालंय. जम्मूत कॉंग्रेस संपलीय. अपवाद फक्त एका उमेदवाराचा. तोही मुस्लीम समाजाचा आणि मुस्लीम बहुल भागातून निवडून आलेला.याची जाणीव उमर अब्दुलांनाही झालेली दिसतीय. त्यांची भाषा निवडणूकीच्या निकालानंतर एकदम बदलूनच गेलीय.
जरांगेच्या बाबतीत मला वाटतं की फडणवीस व शरद पवार हे दोघेही त्यातून काय फायदा मिळवता येईल तो मिळवत आहेत. जाता जाता जे मिळेल ते या प्रकारचा तो फायदा असणार आहे.
मात्र जरांगे फडणवीसांच्या तालावर नाचतात हे फारच धाडसाचं विधान वाटतंय. रिस्क रिवॉर्ड रेशोचा विचार करता फडणवीस असं काही करतील हे संभवत नाही. कारण भांड फुटलं तर नुकसानच जास्त होईल.
शरद पवार यांचं राजकारण मूल्याधारीत वगैरे काही नसतं. त्यामुळे त्यांचं लक्ष चौफेर असतं. तसंच त्यांना कोणत्याच नियमांत बांधून ठेवता येत नाही.तसेच ते शेअर बाजारातील डे ट्रेडर सारखे काम करतात. सकाळी जो निर्णय घेतलेला असतो त्याच्या बरोबर उलट निर्णय संध्याकाळी घ्यायचा असतो. काही लोकांना हा दुर्गूण वाटतो. पण तसं काही नाही आहे. दीर्घकालीन धेय्येधोरणे आखणाऱ्यांचे नियम शरद पवारांना लावून चालणार नाही. त्यामुळेच त्यांच यश कमी जास्त होत नाही. फक्त त्यांच्या जवळची माणसे सतत बदलत असतात. नवीन येत असतात व जूनी जात असतात. तसंच याच्या उलटंही होत असतं.
जे निवडून येऊ शकतात पण ज्यांना आत्मविश्वास नाही आहे, अशा लोकांना हेरणं आणि त्यांना राष्ट्रवादीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन ५०-५५ आमदार संख्या पूर्ण करणं हे ते लिलया करू शकत आलेलं आहे.
यापेक्षा मोठं काही करण्याची त्यांच्याकडून नियती अपेक्षाच करत नाही आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. पंतप्रघान पदासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता परमेश्वराने त्यांना बहाल केलेली आहे. जबरदस्त उर्जा व हुषारी असलेला माणूस आहे हा.माझ्या समजूती प्रमाणे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या कॉंग्रेसची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रूजलेली आहेत. अगदी आणीबाणी नंतरच्या निवडणूकीतही हे जाणवलेलं आहे. अशा ताकदवान पक्षाला संपवण्यासाठी तितक्याच ताकदीचा माणूस नियतीने निर्माण केलेला आहे असे वाटते. यशवंतराव चव्हाणांना जे जमलं नाही ते शक्य करून दाखवणे ही सोपी गोष्ट नाही.
या कॉंग्रेसला संपवणे आणि हिंदूत्ववादी पक्षांची मतदान टक्केवारी वाढवणे ह्या एकमेव कामासाठी शरद पवारांची योजना नियतीने केली आहे असे मला वाटते. १९७८ नंतरच्या त्यांच्या प्रत्येक खेळीतून हेच होताना दिसते आहे. कॉंग्रेसविरोधी राजकारणात जनसंघ व भाजपाचे जे कोणी स्पर्धक होते, त्यांना संपवण्याचे खूप मोठे कार्य त्यांच्या हातून आजपर्यंत झाले आहे. लॉंगटर्मचा विचार करता शरद पवारांच्या राजकारणाचा भाजपाला फायदाच झालेला दिसून येतो.
शेअरबाजाराला तरलता देण्याचे खूप मोठे कार्य डे ट्रेडर्स करत असतात. त्यांच्या विना शेअरबाजार हा आठवडा बाजार झाला असता. एक दिवस चालू तर ६ दिवस बंद.महाराष्ट्रातील जनमत हिंदूहितैषी करण्याचे त्यांचे हे कार्य अगदी असेच वंगण घातल्यासारखे शांतपणे सुरक्षीतपणे व सहजगत्या होत आहे.
मात्र वंचीत, राज ठाकरे, उध्दव ठाकरे, अजित पवार तसेच तिसरी आघाडी यांचा मताधार कमी झाल्याचा फायदा कॉंग्रेसला होऊ शकतो..
मी हे सर्व जम्मू काश्मीर व हरियानाच्या मतदान टक्केवारीवरून बोलत आहे. हरियाना सारखंच महाराष्ट्रात होणार असेल तर लोकसभेपेक्षा जास्त मतदान होताना दिसलं पाहिजे.जर मतदान जास्त झालं तर धृवीकरणाला चालना मिळाल्यामुळे असं झालेलं असल्यास भाजप + शिंदे आणि कॉंग्रेस + राष्ट्रवादी असे दोन तट पडलेले दिसायला पाहिजेत.त्यामुळे वंचीत, राज ठाकरे, उध्दव ठाकरे, अजितदादा वगैरें बाजूला पडतील.भाजपाला जिंकवायचं किंवा भाजपाला हरवायचं हे ते दोन तट असतील. बाकीचे दुर्लक्षीत होण्याची शक्यता आहे.
मतांचा अनेक दशकांचा लॉंगटर्म ट्रेंड पाहिला तर हिंदूत्वाची मते वाढताना दिसताहेत. तर हिंदूविरोधी मते घटताना दिसताहेत. हा कल भारतात ४० वर्षे दिसायला लागलेला असून याची व्याप्ती आता भारताबाहेरही जाणवायला लागला आहे.
मुस्लिम व्होटबँक पूर्वीइतकीच ताकदवान आहे. तीने ५६ मुस्लीम खासदार लोकसभेला पाठवलेले आहेत. भाजपाला १५० खासदारांच्या खाली ठकलून दाखवलेले आहे. भाजपाविरोधात आघाडी सरकारे करून दाखवलेली आहेत.
तरीही या बँकेचे आता फारसं काही चालत नाही आहे कारण हिंदू व्होटबँक मोठी होत चाललेली आहे. मुस्लीम एकीकरणाला आता फारसा वाव राहिलेला नाही तर हिंदू एकीकरणाला अजून बराच वाव शिल्लक आहे हे अजून कोणी फारसं विचारात घेत नाही.
लोकसभेला अशा रातीने मत ट्रान्सफर करता आलेली नाहीत हे देवेंद्र फडणविसांनी स्पष्टपणे कबूल केलेले आहे. भाजपाच्या बाजूने विचार करता हा मुद्दा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. जी मते गेली अनेक दशके विरोधात होती ती मते आली का गेली याचा विचार का करावयाचा? ती फक्त येऊ शकतात. जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण ती कधी आलेलीच नव्हती. त्यामुळे हा विचार अजितदादांनी करावयाचा आहे.पण अजितदादांना बरोबर घेतल्यामुळे काठावरचे काही भाजपप्रेमी नाराज झाले हा भाजपाचा खरा प्रश्न आहे.
याबाबत एवढेच म्हणता येईल की लोकसभेच्या वेळी कोंडलेली वाफ बाहेर पडलेली आहे. इतकेच नव्हे तर भाजपच बहुमत हुकल्यामुळे या लांब गेलेल्या लोकांना वाईटही वाटलेलं आहे. भाजपाला अक्कल शिकवण्याच्या नादात आपण जरा जास्तच मोठी शिक्षा केली असंही या लोकांना वाटू लागलं आहे. भाजपाला धडा तर शिकवायचा होता तरीही भाजपच बहुमत जावे किंवा कॉंग्रेसचा विजय व्हावा असं कोणालाच वाटत नव्हते. ही सगळी मंडळी परत येताना दिसताहेत.
२०१९ ला झाडे कापण्याच्या प्रकारात बरेच भाजपहितैशी फडणविसांच्या विरोधात गेले होते व आदित्य ठाकरेंना पर्यावरणवादी बनवून टाकले होते. पण नंतर महाआघाडीचे सरकार आल्यावर भावनेच्या भरात भाजपविरोधी मतदान केल्याचं दुःखही व्यक्त करत होते. अगदी तसच थोडसं लोकसभा मतदानानंतर होताना दिसत आहे.
उध्दव ठाकरे फोनही उचलत नव्हते. मात्र शरद पवारांशी बोलणी चालू होती. फडणवीसांनीही एकदा सांगितलं होतं की त्यांचं निवडणुकी अगोदर शरद पवारांशी साटलोटं चालू होतं. पाडापाडीचे खेळ त्यांनी जास्त केले. मी कित्येक भाजप बंडखोरांना खाली बसवलं पण उध्दव ठाकरेंनी तसं केलं नाही. पण मला या कथाकथनात जायचंच नाहीये.
मी २०१४ व २०१९ या दोन निवडणूकाच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार दाखवून दिले होते की, भाजपाने युतीधर्म पाळलेला दिसतोय. तर शिवसेनेने पाळलेला दिसत नाहीये. शिवसेनेची मते सरळ सरळ कॉंग्रेस, राष्ट्रवादीला गेलेली दिसत आहेत.
२०१४ मधे भाजप व शिवसेना वेगळे लढले होते. नंतर एकत्र आले होते. दोघांच्या मिळून १२२ + ६३ = १८५ जागा होत्या. त्यामुळे हा हिदूत्वाच्या जागांचा किंवा कॉंग्रेसविरोधी राजकारणाचा विक्रम आहे असे मी समजतो.२०१९ मधे शिवसेना व राष्ट्रवादी यांचं निवडणुकी अगोदरच काही सुत जमलं होतं. मी मतदान टक्केवारीच्या सहाय्याने हे दाखवून दिले होते की, भाजपाला दगा देण्याची खेळी शिवसेना निवडणूकी अगोदरपासून करत होता. तसा लेख ही मी मिपावर लिहिला होता.त्यामुळे भाजपाच्या जास्त जागा येऊ नयेत ही धडपड शिवसेना व राष्ट्रवादी जोडने आखत होते. असं असूनही त्यावेळचा स्टेराईक रेट ६४ असेल तरआज भाजपा शिवसेना एकदिलाने लढत असतील व शिंदेंना मुमं पद मिळत असल्याने पाडापाडीचे खेळ एकदम बंद होणार असतील तर स्ट्राईक रेट ६४% च्या वरती जाणं अशक्य कोटीतलं का वाटावं?
जर माझे तर्क बरोबर असतील तर लोकसभेपेक्षा विधानसभेला मतदान किमान ३% तरी वाढलं पाहिजे. बघूया काय होतंय ते.
पटतंय.हरियानांत असंच मानसिक झोल वगैरे बऱ्याच जणांच झालंय.आता जयराम नरेश म्हणाले की आम्हांला हा निकाल मान्य नाही. यांवर बऱ्याच जणांनी त्यांच्यावर टिका केली. पण जयराम नरेश मनापासून तसं म्हणाले असंच मला वाटतंय. तेच नव्हे तर एक्झीट पोलही प्रामाणिकपणेच आले होते. कॉंग्रेस चक्क जिंकताना दिसत होती. अगदी भाजपाले पण म्हणत होते की आम्हालाही एवढी अपेक्षा नव्हती.एकदम माइंड गेम करणारीच निवडणूूक होती ती. यावेळेस इव्हीम मशिनवर संशय घेतला गेला. प्रत्यक्षात तसं नव्हतं. पण संशय यावा असंच काहीतरी घडताना दिसत होतं खरं.मी मतदान टक्केवारी अभ्यासायला लागलो तेंव्हां कुठेतरी माझ्या थोडेफार लक्षात यायला लागलं. पण अजून अभ्यास चालूच आहे. सगळा डाटा मिळाल्याशिवाय बोलण्यात काही अर्थ नाही.ट्रंप आला की आपल्याला त्रास वाढणार आहे हे चीनला माहीत आहे. तेही कारण चीनला माघार घ्यायला प्रवृत्त करत असेल. थोडक्यात ट्रंप येतोय तर
मनसे व शिंदे एकत्र आले तर धमाल येईल. ठाकरे ब्रॅंड + शिंदे साहेबांच्या बरोबरची बाळासाहेबांची खरी शिवसेना हा एक जबरदस्त डाव असेल.काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांना हिंदूत्व स्विकारले होते. झेंडाही बदलला होता. त्यामुळे शिंदे व राज ठाकरे एकत्र येणार असं मी तेंव्हांपासून समजत होतो. पण ते घडताना दिसत नव्हतं.बघूया काय होतंय ते.
ट्रंप येणारेय याची आणखी एक वाटावी असं घडतय की काय बघायचं. आर्देगॉन बदलायला लागलाय. पाकिस्तानपासून लांब जात भारताशी सार्कशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतोय का ते कळेनास्े झालंय.काश्मीर मुद्यावर पाकिस्तानच्या बाजूने बोलत नाहीये. तेही बोलायची संधी मिळत असतानाही. बाहेरचा चेंडू समजून,चक्क चेंडू सोडून देतोय.
पूर्वी उगीचच बाहेरच्या चेंडूवरती बॅटी फिरवत बसायचा.
चीनपासून सतत सावधच राहयला लागेल. कम्युनिस्ट कधीही कायमचे गप्प बसत नाहीत.अरूणाचलचा तुकडा मिळाल्याशिवाय ते गप्प बसणार नाहीत. सध्या ते नाईलाज म्हणून माघार घेताहेत. माघार घेण्या अगोदर सगळे रस्ते वगैरे तयार करून ठेवले आहेत. ते कशासाठी? राहील गांधी २०२४ ला नाही आले तर २०२९ ला येतील याच हिशोबाने ना?
पक्ष | १९८० | १९८५ | १९९० | १९९५ | १९९९ | २००४ | २००९ | २०१४ | २०१९ |
काँग्रेस(इं) | ४४.५४ | ४३.४० | ३८.२० | ३१.०० | २७.२० | २१.१० | २१.०० | १८.१० | १५.८७ |
काँग्रेस(चड्डी) | २०.५० | १७.३० | |||||||
राष्ट्रवादी | २२.६० | १८.७० | १६.४० | १७.४० | १६.७१ | ||||
एकूण | ६५.०० | ६०.७० | ३८.२० | ३१.०० | ४९.८० | ३९.८० | ३७.४० | ३५.५० | ३२.५८ |
थोडक्यात१९८० पासून काँग्रेसचा जनाधार कमी होत असून त्याला अपवाद १९९९ चा आहे. पण त्यानंतरही काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा जनाधार घसरत चाललेला असून तो ट्रेंड याही निवडणूकीत कायम आहे.