जुई

वेलावर उतरले नभातील तारे
डोकावे हळूच रूप हासरे

शुभ्र पाकळी वाऱ्यावर डोले
वाऱ्यासवे वाहती गंध अंतरिचे

कुठली कस्तुरी, कुठली अत्तरे
माझ्या जुईपुढे सारे फ़िके

छेडती गार हेमंत वारे
स्पर्श होताच, जुई मोहरे

धुंद आसमंत निःशब्द झाले
छेडिले मनाने निषाद होते