विठ्ठल

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला

तुळशी माळ गळा, घेतो नाव ओठी 
पंढरी निघाला, वृद्ध वारकरी

बोचले कंकर, काटेही किती
तापली धरती, उन डोईवरी

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला

तुझ्या भक्तीपोटि, करतो ही वारी
आषाढी कार्तिकी, येतो नित्यनेमी

तुझ्या भेटीची, आस लागली
मन अधीर, आले प्राण कंठी

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला

सावळी मूर्ती, कर कटीवरी
माझा पंढरी, उभा विटेवरी 

टीळा चंदनी, शोभतो कापाळी
शेला रेशमी, शेजारी रखमाई

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला

रूप असे, साठवी लोचनी
तुझ्या दर्शनी, मन समाधानी


मुक्तिचे द्वार, आता उघडावी
भेट पुढची, व्हावी वैकुंठी 

धाव घेई विठ्ठला, दर्शन देई विठ्ठला