कोजागरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा . शारद ऋतूची सुरुवात झालेली असते, थंडीची चाहूल लागलेली असते. हवेमध्ये उष्मा नसतो आणि हवा फार थंडही नसते, एकंदरीत हवामान आल्हाददायक असते. आणि अशा ऋतूमधील पौर्णिमा म्हणजे पर्वणीच. पूर्णचंद्राच्या साक्षीने प्रियजनांच्या सोबतीमध्ये काही आनंदाचे क्षण व्यतीत करण्यासाठी कोजागरी पौर्णिमेचे निमित्त मिळते.
कोजागरी पौर्णिमा सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करीत असतात आणि त्यात दोन एकसमा न मुख्य घटक असतात -- एक म्हणजे रात्री उशीरापर्यंत नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या समवेत जागरण आणि आटीव, सुमधुर केशरी दूध. कोजागरीसाठीचे हे खास दूध करण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, आजकाल दुधाचा मसाला बाजारात देखील उपलब्ध असतो. चंद्रप्रकाशामध्ये केशरी दुधाची गोडी काही न्यारीच असते.
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीतलावर विहार करण्याकरता आलेली असते. संचार करीत असताना ती विचारते "को ss जागर्ति?" म्हणजे (रात्रीच्या या प्रहरी) कोण जागृत आहे? आणि जे कोणी जागृत असतील त्यांना लक्ष्मीचा कृपाप्रसाद प्राप्तं होतो. आजच्या पौणिमेला सर्वांच्या मस्तकी लक्ष्मीचा वरदहस्त राहो हीच माझी शुभकामना!
केशरी दूध
https://www.youtube.com/watch?v=cH41SALHX_k