पनीर मश्रूम

  • पनीर पाव किलो
  • मश्रूम्स ४०० ग्रॅम
  • तेल २० मिली
  • अमूल बटर ५० ग्रॅम
  • गरम मसाला दोन टीस्पून
  • जिरे अर्धा टीस्पून
  • हिरव्या मिरच्या तीन (पाच ते सहा सेंमी लांब)
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर गरजेप्रमाणे
४५ मिनिटे
दोन जणांसाठी

पनीर मश्रूम

पनीर धुऊन घ्यावे. त्याचे अर्धा सेंमी लांबी-रुंदी-उंचीचे तुकडे करावेत.

मश्रूम्स स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि चिरून मोठे तुकडे (दीड-दोन सेंमी ) करावेत.

नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घालून मंद आचेवर गरम करावे. तेल धुरावायला आले की त्यात अमूल बटर घालावे. बटर वितळून लगेच धुरावेल. त्यात जिरे आणि मिरच्या घालून ज्योत मध्यम करावी. जिरे रंग बदलायला लागले की पनीरचे तुकडे घालून ज्योत बारीक करावी आणि अलगद परतावे. दोन मिनिटांनी गरम मसाला घालून अलगद हलवावे. पनीरचे तुकडे तुटायला नकोत. पनीरपुरते मीठ घालावे. ज्योत मध्यम करून पनीरचे तुकडे हलवत थोडे कुरकुरीत करावेत.

मश्रूम्सचे तुकडे घालून हळू हाताने हलवावे. मश्रूम्सपुरते मीठ घालावे. मश्रूम्सला पाणी सुटू लागले की ज्योत बारीक करावी.

मश्रूम्सचे पाणी आळेस्तोवर मधून मधून अलगद हलवत रहावे.

पाणी आळल्यावर ज्योत बंद करावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

सोबत कुरकुरीत भाजलेला गार्लिक ब्रेड उत्तम. ब्रेडवर पीनट बटर लावले तर अधिक उत्तम.