पालक धुऊन देठे तोडून वाफवून घ्यावा. थंडावल्यावर मिक्सरमधून काढून घ्यावा.
मूगडाळ शिजवून घ्यावी.थंडावल्यावर मिक्सरमधून काढून घ्यावी.
लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्याव्यात.
कढईत तेल तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करून मोहरी, जिरे, हिंग, हळद घालावी. मग उभ्या चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि मिरच्या घालून त्या कुरकुरीत होईस्तोवर तळाव्यात.
त्यावर पालक पेस्ट, काळा मसाला नि मीठ घालून सारखे करावे.
पाचेक मिनिटांनी त्यात डाळ घालून गरजेप्रमाणे पाणी घालून मंद आचेवर उकळायला लावावे.
सर्व नीट एकजीव झाले की ज्योत बंद करावी.
याची वाढीव आवृत्ती:
चार लिंबाच्या आकाराचे बटाटे उकडून घ्यावेत. ते गार झाल्यावर सोलून प्रत्येक बटाट्याचे दोन तुकडे करावेत आणि तळून घ्यावेत. त्या तळलेल्या तुकड्यांना मीठ, आणि आवडीप्रमाणे तिखट, मिरपूड, चाट मसाला, पेरीपेरी मसाला इ चोळून ठेवावे.
पानात वाढताना वाटीत यातले दोन तुकडे घालून त्यावर लसूणी पालक डाळ वाढावी.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.